विशेष प्रतिनिधी
पुणे : दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या ला अटक करण्यात आली .
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार दिनेश कुमार असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले.
सखोल पडताळणीनंतर दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये हवाई दलाचे दोन टी-शर्ट, कॉम्बॅट पँट, कॉम्बॅट शूज, हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित सहभाग तपासले जात आहेत.
Man arrested in Pune for cheating by pretending to be an Air Force personnel
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर