विशेष प्रतिनिधी
पुणे : Manikrao Kokate कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातच मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर आता पवारांनाच मानहानीच्या दाव्याची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.Manikrao Kokate
रोहित पवारांनी ट्विट करून या नोटीसीची माहिती दिली. ते म्हणाले, “माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सार्वजनिक केल्याने मला मानहानीची नोटीस आली आहे. कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून एवढे मोठे कांड करूनही तुम्ही वाचलात. मानहानीची एवढी काळजी असेल, तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला?” असा सवाल त्यांनी केला.Manikrao Kokate
पुढे पवार म्हणाले, “तुमची नोटीस वाचून हसूच आवरले नाही. मात्र हे लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी कधी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासह सिद्ध केले होते आणि उद्याही करीन.”
राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना माणिकराव कोकाटे हे सभागृहात रम्मी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ समोर आला. रोहित पवारांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शेतकरी संघटनांनीही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाढता दबाव पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी खात्याची जबाबदारी काढून घेऊन कोकाटे यांना क्रीडा खाते दिले.
टीकेचा भडिमार झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “मी सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी युट्यूब सुरू केले होते. पण मोबाईलवर आलेल्या रम्मी गेमच्या जाहिराती स्कीप करताना हा व्हिडिओ काढला गेला. मी काही चुकीचे केले नाही, फक्त जाहिरात स्कीप करत होतो. आजकाल युट्यूबवर गाणी, गेम्स यासारख्या जाहिराती अपरिहार्यपणे येतात. त्या रोहित पवारांच्या मोबाईलवर येत नाहीत का? मात्र त्यांनी या घटनेचे भांडवल करून स्वतःची करमणूक केली.”
Manikrao Kokate Rummy Case: Defamation notice to Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार