विशेष प्रतिनिधी
नाशिक : मराठा आंदाेलक मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काहीही फायदा नाही. मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनीच केले आहे. प्रत्येक गावागावातील मराठा समाज बांधवांना आणि गावातील वातावरण बिघडवण्याचे काम त्यांनी केलं आहे. दुसरं काहीही झालं नाही, असा हल्लाबाेल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर केली आहे. Manoj Jarange
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा घेतला असताना भुजबळ यांनी टीका केली आहे. भुजबळ म्हणाले, जे झालंय जे होतंय ते तुमच्या समोर आहे. जे नवीन नेते उभे राहिलेत ते काही निर्णय घेत आहेत . अनेकवेळा अभ्यासही नसतो आरक्षण कशाला म्हणतात ते का द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे , सुप्रीम कोर्ट आणि आयोगाचे निर्णय काय आहे, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाही. ज्यांचा अभ्यास नाही त्यांना काय वाटतं त्याची पर्वा करण्याचं काही कारण नाही,
भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाचे आरक्षण फडणवीस सरकारने मान्य केलंय. आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. गोर गरीब आणि भटक्या विमुक्त जनतेचे आरक्षण त्यांना सांभाळुन घ्या. त्यांना सहकार्य करा.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कोणीही नाराज होण्याची गरज नाही. आमचं आरक्षण 1994-1995 पासून मिळालेलं आहे. यामध्ये काही लोकांनी फांद्या मारून कोर्टात जाऊन अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे आमचं आरक्षण खाली वर होत होतं. सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्यावर कोणीही नाराज होण्याचं कारण नाही. हा क्षण आनंदाचा असल्याचे भुजबळ म्हणाले.
अनेक नेते निवडून येतात ते मराठा समाजाचे आहे त्यांनी यापूर्वीच कुणबी सर्टिफिकेट घेतले आहे. तरीसुद्धा ओबीसी बाजूने लढताना ते ओबीसी बाजूने लढत नाही ते विरुद्ध बाजूने लढतात. तुम्ही ओबीसी सर्टिफिकेटवर फायदा घेतला आहे तर तुम्ही ओबीसी बाजूने लढा. ओबीसींवर अन्याय होतोय एकतर ओबीसी जागा घ्यायच्या आणि जागा घेऊन तिथं बसून पुन्हा ओबीसीला विरोध करायचा, असा आरोप त्यांनी केला आहे.
Manoj Jarange did more damage to the Maratha community, Chhagan Bhujbal attacks
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा