विशेष प्रतिनिधी
पुणे : शनिवार वाडा येथील कथित ‘नमाज’ प्रकरणानंतर राजकीय वाद पुन्हा पेटला आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्यावर शहरात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
डंबाळे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक ॲडव्होकेट हाजी गफूर पठाण हेही उपस्थित होते.
डंबाळे म्हणाले, “१९ ऑक्टोबर रोजी मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह शनिवार वाड्यात प्रवेश करून पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यांनी केलेले ‘शुद्धीकरण’ हे बेकायदेशीर असून त्यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ वाढला. या कृतीमुळे पुणे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर आले होते.”
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी या संस्थेनेही मेधा कुलकर्णी यांच्या कृतीचा निषेध केला आहे. “एक खासदार म्हणून त्यांचे हे वर्तन अशोभनीय असून धार्मिक वैमनस्य पसरवणारे आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी संस्थेने केली आहे.
संस्थेने असा आरोप केला आहे की, मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वीही कसबा पेठेतील छोटा शेख सलाउद्दीन दर्गा येथे अशाच प्रकारचे कृत्य केले होते. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा हेतू आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
ॲड. गफूर पठाण म्हणाले, “धार्मिक एकतेचा संदेश देण्याऐवजी विभाजन निर्माण करणे हे सुसंस्कृत राज्यकर्त्यांना शोभणारे नाही. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून तातडीने कारवाई करावी.”
Medha Kulkarni Accused of Inciting Religious Tension Over Shaniwarwada
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















