विशेष प्रतिनिधी
मुंबई : आक्षेपार्ह व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांनी मिळून सामूहिक अत्याचार केला आहे. मुलीचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले. तिला ब्लॅकमेल करून अत्याचार केला. हे पाचही जण अल्पवयीन आहे. Minor girl gang-raped
या प्रकरणी मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी आधी अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ शूट केले. नंतर तिला आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं. ब्लॅकमेलिंगला तरूणी बळी पडली. जणांनी मिळून लैंगिक शोषण केलं.
गेल्या काही दिवसांपासून तरूणीवर अत्याचार सुरू होता. सततच्या अत्याचाराला कंटाळून पालकांना आपबिती सांगण्याचा निर्णय घेतला. पीडितेनं कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. पीडित मुलीच्या आईनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधमांविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा नोंदवून तपास करीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ही पाच मुले नेमकी कोण आहेत? यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Minor girl gang-raped by 5 men after blackmailing her with an offensive video
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला