विशेष प्रतिनिधी
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याचे शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (दि. १३) मॉन्सून अंदमान-निकोबार बेटसमूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच २७ मे रोजी मॉन्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत पोहोचण्याच अंदाज हवामन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
साधारणत: मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये पोचतो. मॉन्सूनचे केरळमधील आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी झाले होते. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात दिवसांत (६ जून) मॉन्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोहोचला होता. यंदा मॉन्सून पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल स्पष्ट होईल. मात्र, सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्रात 7 ते 8 जूनच्या दरम्यान मान्सून पोहोचेल. पुढील दोन ते तिन दिवसांमध्ये पुण्यासह संपर्णँ महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज आहे, जेष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.
यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होईल.
Monsoon will arrive in Maharashtra in the first week of June
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित