विशेष प्रतिनिधी
पुणे : Dr. Pranjal Khewalkar राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेले डॉ. प्रांजल खेवलकर यांची अडचण आणखी वाढली आहे. एका महिलेच्या संमतीशिवाय तिचे फोटो व व्हिडिओ काढल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे.Dr. Pranjal Khewalkar
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66E आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, खेवलकर यांनी तिच्या परवानगीशिवाय गुप्तपणे व्हिडिओ आणि छायाचित्रे घेतली.
यापूर्वी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांच्या मोबाईलमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचे उघड केले होते. या उघडकीनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.
डॉ. प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असून, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. जमीन खरेदी-विक्री, रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंट, साखर व ऊर्जा उद्योग तसेच ट्रॅव्हल व्यवसायात त्यांचा सहभाग आहे. खेवलकर हे राजकारणापासून दूर असले तरी त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहेत.
खराडी येथील स्टुडिओ फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून 2.5 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम गांजा जप्त केले होते. या प्रकरणात खेवलकर यांच्यासह इतर सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईल व डिजिटल उपकरणांतून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
नवीन सायबर गुन्हा नोंदवल्यानंतर खेवलकर यांच्यावरील तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे व संबंधित पक्षांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
New case against Dr. Pranjal Khewalkar, son-in-law of Eknath Khadse, accused in the Pune rave party case
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला