विशेष प्रतिनिधी
पुणे : कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांची माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि पुणे पोलिसांनी १९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या दरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. NIA and ATS
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी मिळून मध्यरात्रीनंतर मोठी शोधमोहीम सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या शोधमोहीमेकरिता कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंदाजे पाचशेहून अधिक पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी सुमारे ३५० अधिकारी व कर्मचारी हे पुणे पोलिस आणि एटीएसचे असल्याचे कळते.
एनआयए, एटीएस आणि पुणे पोलिसांनी ही मोहीम रात्रीभर चालवली. संशयितांची चौकशी सुरू असून, नेमक्या कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, ही कारवाई अतिसंवेदनशील स्वरूपाची असल्याने सर्व तपास गोपनीयतेतून केला जात आहे.
सुरक्षा यंत्रणांनी कोणधवा परिसरात वाढीव गस्त आणि चौकशी सुरू ठेवली आहे. या प्रकरणासंबंधी अधिकृत माहिती आल्यानंतरच तपशील जाहीर केला जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सुरू होती. ज्या घरांवर छापे टाकण्यात आले, तेथील रहिवाशांची ओळख व पार्श्वभूमीची तपासणी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील बाब आहे.
NIA and ATS raid in Kondhwa; some suspects detained
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा