विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर परदेशात पळाला. निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या कुटुंबाची बॅंक खाती गोठवणण्यात आली आहे. दरम्यान, पुणे पोलीस निलेश घायवळच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी आहिल्यानगरमध्ये पोहोचले होते. मात्र त्याचे कुटुंबीय गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंड निलेश घायवळचा भाऊ, दोन मुले आणि पत्नी आणि इतर सदस्य गायब झाले आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यांतील नातेवाईक गायब झाल्याचे समोर आले आहे. निलेश घायवळ मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांकडून दोन्ही ठिकाणी नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, लंडनमध्ये पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलं आहे.
फरार कुख्यात निलेश घायवळने लंडन गाठल्यानंतर पोलिसांच्या तपासाला आता गती मिळाली असून त्याने पासपोर्टवर कुठला पत्ता टाकला, पासपोर्ट जमा का केला नाही, यासह त्याच्या घरावरही धाड टाकून स्कॉर्पिओ कार जप्त केल्या आहेत. त्यानंतर, आता पोलिसांकडून निलेश घायवळची बँक खातीही फ्रिज करण्यात आली आहेत. कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ गँगमधील काही जणांना पोलिसांनी अटक केली असून निलेश घायवळ फरार झाला आहे. मात्र, तो थेट लंडनला पसार झाल्याचं पुणे पोलिसांच्या तपासातून पुढे आले. त्यामुळे, आता पोलिसांकडून त्याच्या मालमत्तेवरही टाच आणली जात असून त्याची 10 बँक खातही फ्रिज केली आहेत.
पुणे पोलिसांनी 10 बँक अकाऊंट फ्रिज केली आहेत आणि त्यातून 38 लाख रुपये जप्त केले. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांवर पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रिज करण्यात आलेली अकाउंट्स शुभांगी सचिन घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, निलेश घायवळ 2 वेगवेगळे खाते आणि सचिन घायवळ यांच्या नावावर आहेत. ही खाती विविध बँकांमध्ये असून त्यामध्ये जमा असलेले सर्व पैसे आता वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
Nilesh Ghaywal’s brothers, wife, children and relatives disappeared!
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!