कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!

कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात ३ मुलींसोबत अमानुष प्रकार घडला. पोलिसांनी ३ मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केली असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तुम्ही महार, मांगाच्या पोरी आहात, किती मुलांसोबत झोपलात, लेसबियन आहात का ? अशा घाणेरड्या शब्दात प्रश्न विचारले. हे प्रश्न म्हणजे एक पोलिस तपासाचा भाग असल्याचं सांगितलं. या प्रकरणी या ३ तरूणींनी पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्या तरुणींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. मात्र, तिथे पोलिसांकडून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. याबाबत एका तरूणीने फेसबुकवर व्हिडिओ पोस्टवर माहिती दिली. दरम्यान, आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर कोथरूड पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडून आंदोलन केलं.

या घटनेबाबत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. या सगळ्या प्रकरणात संबंधित पोलिसांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. अशा आशयाचं पत्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आणि तरूणींना पाठवलं होतं. त्यानंतर आंदोलकांकडून दोन तासांचा वेळ घेऊन पुणे पोलिसांनी सात पानांचे पत्र आंदोलकांना दिले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांकडून कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप करण्यात आले.



या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना X च्या माध्यमातून काही प्रश्न विचारले आहेत. पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणलंय पाहूया..

कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

१. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता?

२. छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पिडीत युवती कोण?

३. या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन केले?

४. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का?

५. कोथरूडला तीन युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेले, यासाठी पोलिसांकडे तसा सर्च वारंट होतं का?

६. चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या? पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? कुणाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?

७. या तीन युवतीना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली?

एकूणच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्यावरून पोलिसांवर असलेला राजकीय दबाव स्पष्ट दिसत असून पोलीस यंत्रणा केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, असा समज पसरत आहे. परिणामी पोलीस यंत्रणेविषयीच जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. असे संतप्त सवाल पवार यांनी पुणे पोलिसांना विचारलेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकी घडामोडी घडणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

No action against police in Kothrud case; Who is the OBC victim? Rohit Pawar questions Pune police!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023