विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील वाडिया महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली असताना, उद्घाटनाच्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) पोस्टर लावण्यात आल्याने सोमवारी (दि.१३) मनसे व अभाविप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. या प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यालयालाच कुलूप ठोकले. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी पुण्यात येऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. Amit Thackeray
पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “काल जो राडा झाला त्यानंतर आज मी आयुक्तांना भेटायला आलो आहे. हा माझा दुसरा दौरा आहे. सत्तेत कोण आहे, किती दबाव आणला तरी फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत उभा आहे. जर बोट दाखवलं तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ. कृतीला प्रतिक्रिया मिळणारच.
माझा कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतू नाही असे स्पष्ट करत अमित ठाकरे म्हणाले, कायदा सर्वांसाठी समान असावा. स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका. काल आम्ही एक कार्यालय बंद केलं, पण मुख्य मुद्दा म्हणजे पोस्टर लावण्याचा आहे. जर त्यांच्या मुलांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, तर त्यांच्या सर्व शाखा बंद कराव्या लागतील. पोस्टर लावून बहिष्कार लिहिला की चालतं का? पाहूया, कोण आहेत ते विद्यार्थी. आम्हालाही त्याच प्रकारची प्रतिक्रिया द्यावी लागेल.”
या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, “हा किरकोळ गुन्हा आहे. आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला सरावलेलो आहोत. पण न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
अमित ठाकरे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही टीका केली. ते म्हणाले , “आज पुण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अंमली पदार्थांचे सेवन, महिलांवर अत्याचार वाढले आहे. अल्पवयीन मुलांना दारू दिली जात आहे, ही धोकादायक बाब आहे. पोर्श अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला, त्यानंतरही काही बदल झालेला दिसत नाही. मी स्पष्ट सांगतो की आता या परिस्थितीवर उपाय करण्याची जबाबदारी फक्त पोलिस आयुक्तांवर आहे,
१८ वर्षाखालील मुलांपर्यंत ड्रग्ज आणि दारू पोचत आहे, हे अत्यंत भयंकर आहे. आम्ही लवकरच या प्रकरणातील संबंधित ठिकाणांची व व्यक्तींची यादी तयार करणार आहोत आणि ती अधिकाऱ्यांकडे सादर करू, असे ठाकरे यांनी सांगितले.
No matter how much pressure you put on the government, you will get a response, Amit Thackeray warns ABVP
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा