विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात मंगळवारी ( 25 फेब्रुवारी ) दत्ता गाडे नावाच्या सराईत गुन्हेगाराने 26 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. वर्दीळीच्या ठिकाणी असलेल्या स्वारगेट बस स्थानकात हा प्रकार घडला. गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवाशी आहे. गाडे हा फरार असल्याने त्याच्या जवळील व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी गाडेच्या एका मैत्रिणीची पोलिसांनी चौकशी केली. त्यात तिने धक्कादायक माहिती दिली आहे.
आरोपी गाडे हा तिला सातत्याने फोन आणि मॅसेज करत असे. शिवाय तुझ्या मैत्रिणींशी ओळख करून दे, असे गाडे मैत्रिणीला म्हणायचा, अशी माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे.
26 वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी गाडे फरार झाला आहे. त्याच्या मागावर पोलिसांची 13 पथके आहेत. पोलिसांकडून गाडेच्या जवळील व्यक्तींची चौकशी केली जात असतानाच त्याच्या मित्र-मैत्रिणीचीही चौकशी करण्यात आली. यात भोरमधील एका मैत्रिणीने धक्कादायक खुलासे केले आहेत.
गाडे हा सातत्याने मला मॅसेज करायचा. दोघांची एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे, असे गाडे सातत्याने बोलायचा. तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा, असे गाडेच्या मैत्रिणीने पोलीस चौकशीत म्हटले.
दत्ता गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी. याआधीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत गाडेच्या 10 मित्र-मैत्रिणींशी चौकशी केली आहे.
One lakh reward on accused in Swargate rape case, police appeal to citizens
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…