विशेष प्रतिनिधी
पुणे sharpshooter जिल्ह्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचा हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक संतप्त झाले आहेत. रविवारी संतप्त जमावाने वनविभागाची गाडी पेटवून दिली होती. आज पुणे – नाशिक महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.sharpshooter
सकाळीच शार्प शूटरची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. रोहन हा घराजवळ खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला होता.sharpshooter
घटनेनंतर स्थानिक संतप्त जमावाने वनविभागची गाडी पेटवून दिली. दहा दिवसांत ही दुसरी घटना आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी, जुन्नर, मंचर, खेड, शिरूर या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना आहेत. दरम्यान, नरभक्षक बिबट्याचा शोध घेऊन ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिबट्याचा बंदूकधारी पथकाकडून शोध सुरू आहे.
Order given to shoot man-eating leopard, sharpshooter teams deployed)
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















