PMP ticket पीएमपीचे तिकीट दर आणि पास महागणार; संचालक मंडळाचा निर्णय

PMP ticket पीएमपीचे तिकीट दर आणि पास महागणार; संचालक मंडळाचा निर्णय

PMP ticket

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणेकरांसाठी पीएमपीने प्रवास करणे आता अधिक खर्चिक ठरणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाने तिकीट दर आणि मासिक पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत माफक दरात पीएमपीची सेवा दिली जाते. दररोज सुमारे १२ लाख प्रवासी या बससेवेचा लाभ घेतात. मात्र, कर्मचारी वेतनवाढ आणि इंधन दरवाढ यामुळे पीएमपीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.

नवीन तिकीट आणि पास दर पुढीलप्रमाणे:

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दैनिक पास जो सध्या एका हद्दीसाठी ४० रुपये आहे आणि मासिक पास जो ९०० रुपये आहे, ते दोन्ही रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी दोन्ही हद्दींसाठी एकच दैनिक पास ७० रुपये आणि मासिक पास १,५०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

पीएमआरडीए हद्दीतील दैनिक पास १२० रुपये ऐवजी आता १५० रुपये झाला आहे.

विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवासी यांच्यासाठीचे पास दर तसेच पीएमआरडीएच्या मासिक पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तसेच पीएमपीने किलोमीटर आधारित स्टेज प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून ५ आणि १० किमी अंतरावर आधारित एकूण ११ स्टेजेस (१ ते ८० किमी पर्यंत) निश्चित करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव १३ मे रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

याशिवाय, पीएमआरडीएच्या अर्थसहाय्याने ५०० नवीन स्वमालकीच्या सीएनजी बसेस खरेदीसाठी २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या बसेस पीएमपीच्या सेवेत दाखल होतील. या बसेस पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या भागीदारीनुसार वाटप करण्यात येतील.

सेवकांच्या वेतनावरचा खर्च कमी करण्यासाठी आवश्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

PMP ticket prices and passes will be expensive; Board of Directors’ decision

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023