मॉडर्न कॉलेजचे कृत्य जाती – आधारित भेदभावाचेः प्रकाश आंबेडकरांचा आरोप; प्रेम बिहाडे नामक दलित विद्यार्थ्याला शिफारस पत्र नाकारल्याने संताप

मॉडर्न कॉलेजचे कृत्य जाती – आधारित भेदभावाचेः प्रकाश आंबेडकरांचा आरोप; प्रेम बिहाडे नामक दलित विद्यार्थ्याला शिफारस पत्र नाकारल्याने संताप

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजने दलित विद्यार्थ्याला नाकारलेले शिफारस पत्र हे जाती-आधारित भेदभावाचे कृत्य असल्याचा आरोप केला आहे. प्रेम बिहाडे नामक विद्यार्थी महाविद्यालयात शिकत असतानाचे वर्तन असमाधानकारक होते, तर मग यापूर्वी त्याला बोनाफाईड सर्टिफिकेटसह 3 शिफारसपत्रे का देण्यात आली? आत्ता त्याला इंग्लंडमध्ये नोकरी लागल्यानंतर त्याला शिफारस पत्र का नाकारण्यात आले? महाविद्यालयाची ही भूमिका जाती-आधारित भेदभावाची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. Prakash Ambedkar

प्रेम बिहाडे नामक तरुण लंडनमध्ये नोकरी करत आहे. त्याने पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. त्याला एका नोकरीसाठी आपल्या कॉलेजचे शिफारसपत्र लागत होते. पण महाविद्यालयाने त्याला ऐनवेळी हे शिफारस पत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याची हातची नोकरी गेली. त्याने एका व्हिडिओद्वारे हा प्रकार उजेडात आणला. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रेम बिहाडे यांना ते प्रस्तुत महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना त्यांचे असमाधानकारक वर्तन व शिस्तभंगाच्या रेकॉर्डमुळे शिफारसपत्र जारी करण्यात आले नाही. पण त्यांनी आपल्या पत्रात त्यांना यापूर्वी 3 शिफारस पत्रे व बोनाफाईड प्रमाणपत्रही जारी करण्याचे मान्य केले आहे.

प्रेमचे मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना वर्तन खरोखरच असमाधानकारक होते, तर त्याच महाविद्यालयाने त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेटसह एक, दोन नव्हे तर तब्बल तीन शिफारस पत्रे जारी का केली ? हे प्राचार्या कसे स्पष्ट करून सांगतील. ही शिफारस पत्रे व बोनाफाईड त्याने यूकेच्या विद्यापीठात प्रवेशासाठी वापरले होते. मग काय बदलले ? तेव्हा तो शिफारसीसाठी योग्य का होता? पण आता परदेशात आपली जागा पक्की केल्यानंतर त्याच्या कॉलेजला त्याचे चारित्र्य अचानक समस्याप्रधान का वाटले? प्रामाणिकपणे सांगायचे तर हा प्रकार शिस्तीबद्दल नाही. हा अस्वस्थतेचा मुद्दा आहे.

दलित विद्यार्थाने समाजाने निश्चित केलेल्या मर्यादा शांतपणे ओलांडण्याचे धाडस दाखवल्यामुळे निर्माण झालेली ही अस्वस्थता आहे. महाविद्यालयाने जे केले आहे ते केवळ अनैतिक नाही, तर ते लक्ष्यित आणि भेदभावपूर्ण कृत्य आहे. ही जातीय पूर्वग्रहात रुजलेली शैक्षणिक तोडफोड आहे. त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी, त्यांनी त्याचा मार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. आपण याला जाती-आधारित भेदभाव म्हणू शकतो. हे फक्त चुकीचे नाही, तर ते गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar Slams Administration for Denying Recommendation Letter to Dalit Student Prem Birhade

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023