विशेष प्रतिनिधी
पुणे: Andekar gang आंदेकर टोळी आणि घायवळ टोळीच्या धुमाकुळामुळे पुण्यातली गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. तेव्हा या गुंडाची गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कालच घायवळ टोळीची धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर हातोडा घातला आहे.
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला समस्त पुणेकर विसर्जनाच्या तयारीत होते. सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह होता. अशातच ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेसारख्या मध्यवर्ती वस्तीत पुणेकरांच्या आनंदावर विरझण टाकणारी घटना घडली. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली. तेव्हाच पुण्यातली आंदेकर टोळीची वाढलेली दहशद बघता कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले आहेत अश्या चर्चा होऊ लागल्या. त्यामुळेच पुणे पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्हं उपस्थित राहिलं होतं. Andekar gang
मात्र आता त्या घटनेचा तपास सुरु असतानाच पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील केली. तसंच या प्रकरणी आरोपी गजाआड गेल्यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट आंदेकर टोळीला नेस्तनाभूत करण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आता पुणे पोलिस आणि पुणे महापालिकेने नानापेठेत संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमध्ये आंदेकर टोळीचं नाना पेठेतलं अनधिकृत बांधकाम आज पाडण्यात आलं आहे. यात आंदेकर टोळीचे अनधिकृत फ्लेक्स पाडले गेले. एवढंच नाही, तर यादरम्यान माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या स्मृतिस्थळानजीक असलेली पाणपोई गॅस कटरच्या मदतीनं काढण्यास आली आहे. शिवाय तिथल्या चौकात लावलेलं वनराज आंदेकरच्या नावाचं पोस्टर देखील हटवण्यात आलं आहे. Andekar gang
तसंच पुण्यात ही टोळी ज्या ठिकाणाहून हप्ते गोळा करायची, त्या मासळी बाजारातील कित्येक अनाधिकृत स्टॉल महापालिकेने उलथवून टाकले आहेत. शिवाय एवढे दिवस ज्या ठिकाणी आंदेकर टोळी वास्तव्याला होती, त्याच परिसरातील अनधिकृत बांधकाम, दुकानं, स्टॉल्स उध्वस्त करण्यात आली आहेत.
खरं तर सध्याच्या घडीला जवळपास संपूर्ण आंदेकर कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांची सगळी संपत्ती देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच आता त्यांचं वर्चस्व असलेल्या नाना पेठ परिसरात कारवाई करून आंदेकरांच्या अस्तित्वाला धक्का पोहोचवण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. त्यामुळेच आता या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कामाचं चांगलाच कौतुक केलं जातंय. Andekar gang
पुढील काळातही बेकायदेशीर बांधकामाच्या आडून पुणे पोलीस आणखी मोठी कारवाई करतील, अशी चिन्हं आता निर्माण झाली आहेत. म्हणूनच आता गुन्हेगार कितीही मोठा असला, तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही. समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांची काय अवस्था केली जाते, हे पुणे पोलिसांनी सगळ्यांनाच दाखवून दिलं आहे. Andekar gang
Pune Police on action mode to eradicate the Andekar gang!
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















