विशेष प्रतिनिधि
पुणे : गेल्या कही वर्षांपासून एआय प्रत्येक क्षेत्रात शिरकाव करताना आपल्याला दिसतंय. आता गर्दी नियंत्रण करण्यासाठी देखील एआय मदत करणार आहे. या वर्षी पुणे पोलीस गर्दी नियंत्रण करण्यासाठी चक्क ‘एआय’चा वापर करणार आहेत. Pune Police
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान अनेक भाविक विविध मंडळांना भेट देत असतात. कधी ढोल-ताशा पथक बघण्यासाठी तर कधी विसर्जनाची मिरवणुक बघण्यासाठी भाविकांची गर्दी काही मावळतांना दिसत नाही. मात्र याच गर्दीमुळे अनेक वेळा चेंगराचेंगरीचे किंवा मारमारीसारखे प्रसंग देखील उद्भवतात. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस कायमच तत्पर असतात. गणेशोत्सवादरम्यान होत असलेल्या प्रचंड गर्दीला तोंड देण्यासाठी पुणे पोलीस यावर्षी ‘एआय’ साधनांचा वापर करणार आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीतील गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षितता अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.
कसा केला जाणार ‘एआय’चा वापर ?
सार्वजनिक ठिकाणी देखरेख करत असणारे सर्व सिसिटीव्ही कॅमेरे हे एका केंद्रीय नियंत्रण कक्षाशी जोडले जातील. त्यानंतर एआय आधारित व्हिडिओ विश्लेषण प्रणाली अचानक गर्दी जमणे, मारामारी किंवा कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचालींचा मागोवा घेईल आणि पोलिसांना तात्काळ त्याबद्दल सूचित करेल. तसेच वर्दळीच्या भागात असणाऱ्या नागरिकांना विविध अपडेट्स किंवा सूचना देण्यासाठी देखील अधिकारी सार्वजनिक डिजिटल संदेश प्रणालीचा वापर करतांना दिसतील. Pune Police
वाहतूक व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी, प्रमुख मार्गांवरील गर्दीचे निरीक्षण करण्यास तसेच पर्यायी रस्ते सुचवण्यास देखील एआय मदत करेल. सिसिटीव्ही फीड्स सोबतच ड्रोन आणि मोबाईल सर्व्हेलन्स वाहनं देखील असतील. ज्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर जमीनिसोबतच आकाशातून देखील नजर ठेवली जाईल. पोलिसांच्या सर्व गस्त पथकांना व वाहनांना जीपीएस ट्रॅकर्स बसवले जातील, जेणेकरून आपत्कालीन परिस्थित जवळच्या पथकांशी संपर्क साधून लगेच मदत मिळवता येईल.
याशिवाय, उत्सव क्षेत्रावरून उडणारे कुठलेही अनधिकृत किंवा संशयास्पद ड्रोन उडू नये व त्यांना लगेचच निष्क्रिय करता यावे यासाठी ‘अॅंटी ड्रोन गन’ वापरली जाईल. तसेच गर्दीच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी पोलीस यूनिट्स वायरलेस सेट्स वर देखील अवलंबून असतील. Pune Police
या तंत्रज्ञानाच्या मदतीने आखलेल्या उपाययोजनांमुळे गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडेल, असा विश्वास पुणे पोलिसांना आहे.
Pune Police to take help of ‘AI’ for crowd control during Ganeshotsav
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला