विशेष प्रतिनिधी
पुणे: गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणेकरांना अक्षरशा झोडपलं,खडकवासला धरणातून देखील टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. सायंकाळी साडेसात नंतर 35 हजार क्युसेक पाण्याचे विसर्ग करण्यात आल्यानंतर पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीपात्रा लगत असलेल्या नागरी वस्तीत म्हणजेच एकता नगर मधील सोसायट्यांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय हवामान वेधशाळेने पुण्यासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.पुणे शहरात संततधार असली तरी घाटमाथ्यावर पावसाने जोरदार पाऊस पडत असल्याने खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29084 क्युसेक वाढवून सायंकाळी 7.00 वा.35310 क्यूसेक करण्यात आला आहे. खडकवासला विसर्ग सायंकाळी सातनंतर वाढणार असल्याने अतिरिक्त पाणी याभागात शिरणार असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराच्या (आर्मी) तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सात वाजता पाणी सोडल्यावर आठ ते साडेआठ वाजेपर्यंत पाणी एकता नगरीपर्यंत येईल, असे महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले होते.
पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार म्हणाल्या, आमच्याकडून एकता नगर मधील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, विद्युत विभाग अग्निशमन दल आरोग्य विभागाकडून सर्व सुविधा अत्यावश्यक परिस्थिती करिता सज्ज ठेवण्यात आली आहे याशिवाय परिसरात अनाउन्समेंट करण्यात आले आहे, तसेच अत्यावश्यक परिस्थिती रात्रीच्या वेळी उद्भवल्यास ठिकठिकाणी जनरेटरवर होलीजन लावण्यात आले आहेत, याशिवाय स्थानिक नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था जवळच असलेल्या बॅडमिंटन हॉल आणि एका शाळेत करण्यात आले आहे. रात्री सात वाजता पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे रात्रभर आमच्याकडे यंत्रणा या भागात तैनात असणार आहे.
संध्याकाळी आठच्या सुमारास एकता नगरी द्वारका सोसायटीमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली असून फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या जेसीबी सज्ज आहे.
स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल!
पूरग्रस्त असणाऱ्या एकता नगरीत स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी देखील घटनास्थळी दाखल होत. परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार नाही. सकाळी सात वाजल्यापासून आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. अशी माहिती दिली आहे.
पुणेकरांनो सतर्क रहा
धरणक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला साखळी प्रकल्पातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे, ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे धरणांच्या क्षेत्रात पाण्याचा येवा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणामधून मुठा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये. नदीपात्रात तत्सम काही साहित्य, वाहने किंवा जनावरे असल्यास ती तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन केले आहे.
Pune residents, be alert, Ekta Nagar has been flooded, the next few hours will be dangerous!
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला