विशेष प्रतिनिधी
बीड / पुणे : महाराष्ट्रातील जेष्ठ महिला नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना वारंवार अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्या अमोल काळे (वय २५) या युवकाला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मुंबईतील भाजपा कार्यालयाचे सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (वय २६) यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली. अमोल काळे हा सध्या पुण्यात राहणारा विद्यार्थी असून, तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे गेल्या काही दिवसांपासून मंत्री पंकजा मुंडे यांना मोबाईलवरून सतत त्रास देत होता. तो केवळ अश्लील मेसेजच नव्हे, तर मध्यरात्री कॉल करूनही मानसिक त्रास देत होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) अंतर्गत कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा मोबाइल क्रमांक ट्रेस करण्यात आला. स्थान शोधून काढल्यानंतर तो पुण्याच्या भोसरी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. नोडल सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या मदतीने अमोल काळेला ताब्यात घेतले, त्यानंतर प्राथमिक चौकशीत त्याने पंकजा मुंडे यांना कॉल व मेसेज केल्याची कबुली दिली.
त्यानंतर काळेला बीएनएनएस कायद्यानुसार नोटीस बजावून मुंबईत आणण्यात आले आणि अटक करण्यात आली. आरोपीविरोधात सायबर गुन्ह्यांच्या अधिक कलमांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सायबर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Pune student arrested for sending obscene messages to Minister Pankaja Munde
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती




















