विशेष प्रतिनिधी
पुणे : Rahul Gandhi काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतदार याद्यांमधील समस्या माहिती नाही. त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे. ते कारण त्यांनी शोधून काढलयं, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.Rahul Gandhi
कॉंग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदार वाढल्याचा आरोप सातत्याने करत होते. निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचे सांगत पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.Rahul Gandhi
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलिकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम-जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून एक स्क्रीप्ट लिहून घेतली आहे. अतिशय मनोरंजक स्क्रीप्ट आहे. ती स्क्रीप्ट सर्व ठिकाणी मांडत आहे. परंतु या स्क्रीप्टने मनोरंजना पलिकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्याच्याकडे वस्तुस्थितीशी संबंधित नाही. सगळ्या गोष्टी कपोकल्पित मांडत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एकीकडे म्हणत आहेत की, मतदार यादीमध्ये समस्या आहेत. त्यांचा हा आरोप आम्हालाही मान्य आहे. आम्ही इतकी वर्षे हेच सांगत आहोत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची मागणी होती की, व्यापक सुधारणा करा. आता निवडणूक आयोग म्हणत आहे, आम्ही व्यापक सुधारणा करायला तयार आहोत. यासंदर्भात निवडणूक आयोगाने बिहारमध्ये व्यापक सुधारणा करायला सुरुवात केली आहे. पण राहुल गांधी म्हणतात, व्यापक सुधारणा करू नका. मग त्यांना नक्की काय हवं आहे. खरं तर त्यांना व्यापक सुधारणाही माहिती नाही आणि मतदार याद्यांमधील समस्याही माहिती नाही. त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे. ते कारण त्यांनी शोधून काढलयं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राहुल गांधींनी एकदा त्यांचा मेंदू चेक करावा. कदाचित त्यांचा एक मेंदू चोरीला गेला असेल किंवा एका मेंदूमधून चीप चोरीला गेली असेल. तसेच त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी ते रोज बोलतात. खरं तर राहुल गांधी खोटं बोलतात आणि पळून जातात. त्यामुळेच ते नेहमी वेगळी आकडेवारी देतात. मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं की, महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढले. पण आता त्यांनी सांगितलं एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवं सांगून सनसनाटी आरोप करण्याचा ते प्रयत्न करतात, अशी टीका फडणवीस यांनी केली.
Rahul Gandhi need to find some reason to defeat , says Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल