विशेष प्रतिनिधी
पुणे : Nilesh Ghaywal पोलिसांच्या विशेष पथकांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) घरावर सलग दोन दिवस छापेमारी केली. यामध्ये जिवंत काडतुसे, जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि पवनचक्की प्रकल्पाच्या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
कोथरुडमधील गोळीबाराच्या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ माजली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या घायवळ गँगवर पुणे पोलिसांनी मकोका कारवाई केली आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईपूर्वीच नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) परदेशात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळच्या कोथरुड आणि पाषाण परिसरातील दोन ठिकाणच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान स्वयंपाकघरात दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. विशेष म्हणजे घायवळ याच्या नावावर शस्त्र परवाना नाही. Nilesh Ghaywal
त्याचबरोबर सातबारा उतारे, साठेखत आणि विविध जमिनींचे व्यवहार संबंधित कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाइल्सही पोलिसांना सापडल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैसा याबाबत संशय निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने आता घायवळच्या आर्थिक नेटवर्कची सखोल छाननी सुरू केली आहे.
पुणे पोलिसांनी घायवळभोवतीचा फार्स अधिक घट्ट केला आहे. पुणे महानगरपालिकेला पत्र लिहून त्यांनी घायवळच्या नावावर असलेल्या अनधिकृत बांधकामे, मालमत्ता आणि थकीत कर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पुणे महापालिका आता घायवळच्या अनधिकृत मालमत्तांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शहरातील अनेक भागांत त्याने खोट्या नावांनी मालमत्ता विकत घेतल्याचाही संशय व्यक्त होत आहे.
http://youtube.com/post/UgkxgoBxCwKRp6VTHdGs1Vx1d6HhEGN_AXtr?si=8qGGyZYnHGbRVNzw
दरम्यान, नीलेश घायवळचे नवे गुन्हेगारी कारनामे एकामागून एक समोर येत आहेत. अलीकडेच धाराशिवमधील एका व्यापाऱ्याला घायवळने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे धमकी देत दुकानं बंद पाडण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो स्वतःला दुसऱ्या नावाने ओळख करून देत असल्याचे दिसून आले. शिवाय, त्याने खोट्या पत्त्याने आणि नाव बदलून पासपोर्ट मिळवल्याचा खुलासाही पोलिस तपासात झाला आहे. पुणे पोलिसांनी घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हेगारी संघटना चालवणे, खंडणी, धमक्या आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत. आता त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Raids at Nilesh Ghaywal’s house, live cartridges, land transaction documents found
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ