विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात जाती-पातीच्या राजकारण सुरू आहे. डोकी फुटत आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे अशी खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. Raj Thackeray
मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, आज राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मते मिळवण्यासाठी तुमची डोके फोडून घेतात, आग लावतात हे आपल्या लोकांना समजत नाही. लोकांची माथी भडकवण्याचे काम करण्यात येत आहे. आपण गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार आहे. Raj Thackeray
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
सर्व गोष्टीकडून तुम्हाला गुमराह करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जात आहे. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवले जात आहेत. जाणून बुजून हे उद्योग सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. २० दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू. आज मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. सदानंद मोरे सरांनी आताच्या परिस्थितीवर बोलावं म्हणून त्यांना बोलावलं. त्यांची व्याख्याने राज्यभर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटला. लंकेत गेले. कुंभकर्णाला मारलं. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. मध्ये त्यांनी एक सेतू बांधला. हे त्यांनी १४ वर्षात केलं. वांद्रे वरळी सी लिंक आपण १४ वर्षात बांधला. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंक सेतूबितू बांधून गेले. हे सर्व १४ वर्षात घडलं असं सांगत आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला 14 वर्षे लागल्यावरून राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
Raj Thackeray laments the mud of caste-based politics in the state
महत्वाच्या बातम्या
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
- पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप
- माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न? अन्नातून विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा
- बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाचे महिलांसमोर अश्लील वर्तन, महिला दिनीच प्रकाराने संताप