विशेष प्रतिनिधी
सोलापूर : राज ठाकरे यांना माझ्याकडील पुरावे दाखवल्यास ते या लढाईत अधिक ताकदीने उतरतील अशी अपेक्षा व्यक्त करत ईव्हीएमच्या विरोधातील हा लढा त्यांच्या पक्षाच्या उभारणीसाठीही महत्त्वाचा ठरेल,.त्यासाठीराज ठाकरे यांच्यासोबत पुढील आठवड्यात भेट निश्चित झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बाबत गंभीर आरोप करत मोठ्या लढ्याची तयारी सुरू केली आहे. Raj Thackeray
वरळी येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. याचे ईव्हीएम विरोधात मोठा लढा उभारण्याच्या तयारीत असलेल्या जानकर यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, “ईव्हीएममध्ये हेराफेरी होत आहे, आणि यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेणार असून, मारकडवाडी प्रकरणावरही चर्चा करणार आहे. राज ठाकरे यांच मी या लढा निमित्ताने स्वागत करतो
जानकर म्हणाले, “निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे तो हेराफेरी करणारा आहे. विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे. ईव्हीएम हेराफेरीमुळे अनेक अनपेक्षित निकाल लागले आहेत. मी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पाच मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत चिठ्ठी पडण्याच्या वेळा वेगळ्या होत्या
ईव्हीएमविरोधातील या आंदोलनात राज ठाकरे यांच्यासह मनोज झा, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल हेही सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला. “काशीविश्वेश्वरापासून अयोध्येपर्यंत आम्ही साखळी आंदोलन उभे करू,” असे जानकर म्हणाले.
ईव्हीएमच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार जानकर यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. “मी किती मतांनी निवडून आलो हे दाखवण्यासाठीच मी राजीनामा दिला आहे. अन्यथा मी सुप्रीम कोर्टात जाईन,” असे त्यांनी सांगितले.
मारकडवाडी प्रकरणात जिल्हा प्रशासनाने पोलीस का घातले. मारकडवाडी प्रकरणातील जनतेचा आक्रोश आहे तो निवडणूक आयोगाला जाणून घेता आला नाही बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे. माझ्या मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी मी सभापती आणि राज्य सरकारकडे केली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकीत पारदर्शकता आणल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही राज्य सरकारने आमचा काय छळ करायचा ते करू द्या. आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Raj Thackeray’s stand boosted Uttam Jankar’s hopes, inviting him to join the fight against EVMs
महत्वाच्या बातम्या