विशेष प्रतिनिधी
पुणे : Rohini Khadse राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर प्रकरणात पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे अडचणीत सापडल्या आहेत. रोहिणी खडसे यांनी पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस रोहिणी खडसे यांनाही सहआरोपी करण्याची शक्यता आहे.Rohini Khadse
पुण्यातील खराडी भागात असलेल्या एका सोसायटीमधून प्रांजल खेवलकर यांना पार्टीतून अटक करण्यात आली होती. खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, अद्याप जामीन मिळाला नाही आहे. खेवलकर प्रकरणी पुणे न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.Rohini Khadse
प्रांजल खेवलकर यांचे दोन मोबाइल पुणे पोलिसांनी जप्त केले. यातील एक नंबर सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावानं घेण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. सीमकार्ड हरवल्याची तक्रार सोनार याने देऊन पुन्हा तोच नंबर मिळवला आणि व्हाट्सअप डाऊनलोड करून सर्व डाटा डिलिट केला. त्यामुळे खेवलकरच्या मोबाइलमधील डाटा डिलिट झाल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.
मोबाइलमधील डाटा डिलिट करण्यामागे रोहिणी खडसे असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे सोनार आणि रोहिणी खडसे यांना सहआरोपी करण्याची शक्यता आहे. सोनार हा जळगाव जिल्ह्यातील आहे. सोनाराने रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून डाटा डिलिट केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढू शकतात.
खराडी रेव्ह पार्टीमुळे कोठडीत असलेले प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केले. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्यानंतर ते चर्चेत आले आहेत.
Rohini Khadse co-accused in Khewalkar case, police suspect she helped destroy evidence
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला