Rohini Khadse : रोहिणी खडसेंचे बालपणापासून मित्र, पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यावर केला प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह

Rohini Khadse : रोहिणी खडसेंचे बालपणापासून मित्र, पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यावर केला प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह

Rohini Khadse

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rohini Khadse खराडी परिसरातील एका लक्झरी फ्लॅटमध्ये शनिवारी (२६ जुलै) रात्री उशिरा सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये सर्वात मोठं नाव ठरलं ते माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.Rohini Khadse

ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगाने हालचाली सुरू झाल्या असून, विरोधकांनीही खडसेंच्या कुटुंबावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.डॉ. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई असून, त्यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पहिल्या विवाहातून घटस्फोट घेतल्यानंतर बालपणीचे मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केले. हे दाम्पत्य सध्या मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहे.



प्रांजल खेवलकर हे राजकारणात सक्रीय नसले तरी ते जमीन खरेदी-विक्री, रिअल इस्टेट, ट्रॅव्हल एजन्सी, इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय, त्यांच्या नावावर ऊर्जा आणि साखर उद्योगातील कंपन्याही नोंदवलेल्या आहेत, ज्यावर मागील काळात काही आर्थिक अनियमिततेचे आरोपही झाले होते. खेवलकर यापूर्वीही वादात आलं होतं, ते त्यांच्या महागड्या आणि लक्झरी सोनाटा लिमोझिन कारमुळे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी २०१७ मध्ये ही गाडी नियमबाह्य नोंदणी करून वापरण्यात येत असल्याचा आरोप केला होता. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, ही गाडी MH-19-AQ-7800 क्रमांकाने जळगाव आरटीओमध्ये एलएमव्ही (हलकी मोटार) म्हणून नोंदवण्यात आली होती, जे नियमांच्या विरोधात होते. शिवाय देशात केवळ अॅम्बेसिडर लिमोझिन वापरण्यास परवानगी असून, इतर लिमोझिनसाठी मंजुरी नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.

आता पुन्हा एकदा रेव्ह पार्टी प्रकरणामुळे प्रांजल खेवलकर चर्चेत आले आहेत. प्राथमिक तपासात या पार्टीत अमली पदार्थांचे सेवन, मद्यप्राशन आणि महिला उपस्थिती यांची खात्री पटली असून, काही तरुणींनी कारवाईदरम्यान पळ काढल्याची माहिती आहे. त्या कॉलगर्ल असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत. या प्रकरणात सायबर गुन्हे, ड्रग नेटवर्क आणि प्रभावशाली व्यक्तींची संलग्नता यावर तपास अधिक खोलात जाण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने “खडसेंचे जावई कायद्याच्या कक्षेत येणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. तर सोशल मीडियावरही या प्रकरणाचा व्हायरल ट्रेंड सुरू असून #PranjalKhewalkar आणि #KhadseFamily हे ट्रेंड टॉपवर आहेत.

Rohini Khadse married Pranjal Khewalkar, a childhood friend of hers, after divorcing her first husband.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023