विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील ड्रग पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील ड्रग पार्टी प्रकरणी शेकडो महिलांना फसवून त्यांचे अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा आल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य महिला आयोगाने विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. Pranjal Khewalkar
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या महितीनुसार, खेवलकरांच्या ड्रग पार्टी प्रकरणात 250–300 पेक्षा अधिक महिलांना आमिष दाखवून फसवण्यात आले. या पार्टी दरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपमधून अत्यंत अश्लील व्हिडीओ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या आधारे पुणे पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकरणाचा तपास केवळ वरवर न होता, सखोल व्हावा यासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत की, या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीच्या रॅकेटशी असण्याची शक्यता आहे. ड्रग पार्टीमध्ये विविध प्रलोभने दाखवून आणलेल्या महिलांचा गैरवापर झाला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि महिलांची फसवणूक व लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह केला. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंब मुक्ताईनगर येथे राहते. प्रांजल खेवलकर यांचा मुख्य व्यवसाय जमीन खरेदी-विक्रीचा आहे. ते रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या असून, एक ट्रॅव्हल कंपनीदेखील असल्याची माहिती समोर आली आहे.
Rohini Khadse’s husband Pranjal Khewalkar’s feet are getting deeper
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!