विशेष प्रतिनिधी
पुणे : Rupali Patil राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पक्षाच्याच प्रवक्त्या रूपाली ठोंबरे आणखी आक्रमक झाल्या आहेत. मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे, पक्ष आणि आयोग वेगळा आहे. याआधीसुद्धा समाज माध्यमांवर माझ्या विरोधात पोस्ट केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे.Rupali Patil
रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे हा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे त्यांच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात शिस्तभंगाची नोटीस जारी केली. याच पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील तात्काळ शनिवारी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवादबोलताना रूपाली पाटील म्हणाल्या, “मला पक्षाने नोटीस दिली नसून मला पक्षाकडून खुलासा पत्र दिले आहे. मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाचे खुलासा पत्र शुक्रवारी रात्री दिलेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याविरोधात माध्यमांमध्ये जी काही विधाने केली, त्या बाबत खुलासा मला माझ्या पक्षाने मागितला आहे. त्यासाठी सात दिवसाचा कालावधी देण्यात आला असून त्यावर मी खुलासा देईन.कायदेशीर खुलासा आणि त्या पत्राला उत्तर मी देणार आहे. माझा बचाव किंवा सत्य मी खुलासामधून मांडेल. मी कायदेशीर खुलासा करेल.Rupali Patil
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माधवी खंडाळकर यांच्या व्हिडीओ आणि मारहाण आरोपाच्या प्रकरणावर बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “त्यांनी कोणाला फोन केले याचे सीडीआर मी काढणार आहे. पोलीस ठाण्यामध्ये वाद गेल्यानंतर सुरुवातीला तो वाद संपला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. आधी तक्रारी मागे घेतल्या मग गुन्हा दाखल का केला? मी देखील माधवी खंडाळकर यांच्यावर 354 चा गुन्हा दाखल केला. त्या अजित पवारांना भेटल्या, त्यांना कोणीही भेटू शकते. माधवी खंडाळकर यांनी जो गुन्हा दाखल केला तो कोणाच्या सांगण्यावरून दाखल केला? याचा तपास करावा, अशी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली
“मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे, पक्ष आणि आयोग वेगळा आहे. याआधीसुद्धा समाज माध्यमांवर माझ्या विरोधात पोस्ट केली होती, ती मुलगी देखील रूपाली चाकणकर यांचीच होती. स्नेहल चव्हाण असे त्या मुलीचे नाव आहे. हे सगळे पुरावे सुनील तटकरे आणि अजित पवार यांना दिले आहेत. माझ्या खुलासा पत्रामध्ये हे सगळे पुरावे देणार आहे. माधवी खंडाळकर त्या व्हिडीओमध्ये रूपाली चाकणकर यांना फोन लावा, असे देखील म्हणत आहेत. मग रूपाली चाकणकर यांचा संबंध नसताना त्यांना का फोन लावण्यात आला? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
Rupali Patil aggressive against Rupali Chakankar after meeting Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















