विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसच्या राज्य महिला उपाध्यक्ष असलेल्या संगीता तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवर थेट जातीय भेदभावाचे गंभीर आरोप करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मी ब्राह्मण आहे म्हणून मला पक्षात सातत्याने त्रास दिला गेला. माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा कट रचण्यात आला. या संदर्भात मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शंभर ईमेल पाठवले, मात्र एकाही मेलची दखल घेतली गेली नाही, असे त्या म्हणाल्या.
संगीता तिवारी म्हणाल्या की, त्या लवकरच काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. त्यांना महायुतीतील दोन पक्षांकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर मिळाल्या असून त्या लवकरच आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील. त्यांनी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यावरही आरोप करत म्हटले की, मला प्रभारी शहराध्यक्ष पद देण्यात आले होते, पण त्यानंतर माझ्याकडून महिला अध्यक्षांसाठीची केबिन हिसकावून ती एका सेलच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आली. त्यानंतर जर मी ती परत घेण्याचा प्रयत्न केला, तर माझ्यावर अॅट्रॉसिटी लावायची तयारी सुरु झाली. हे सर्व कट अरविंद शिंदे यांच्या पाठबळाने रचले गेले.
तिवारी म्हणाल्या की, मी ब्राह्मण आहे म्हणून मला अप्रत्यक्षपणे भाजपची व्यक्ती समजून बाजूला काढले गेले. पक्षातील काही नेते स्पष्टपणे बोलत होते की ब्राह्मण मतदार काँग्रेसला मतदान करत नाही, त्यामुळे त्यांना महत्वही देऊ नये. याच मानसिकतेमुळे आज काँग्रेस रसातळाला चालली आहे, असे ती म्हणाल्या.
नेते असोत किंवा कार्यकर्ते, विशेषतः महिला पदाधिकारी जर स्वतःच्या पक्षातच घुसमटत असतील, त्यांना दडपले जात असेल, तर वेगळा निर्णय घ्यावाच लागतो. संघटना जर आपल्याला स्वीकारत नसेल, तर त्यात टिकून राहण्यात काही अर्थ नाही. मग कुणी त्याला गद्दारी म्हणा, किंवा धोका म्हणा, पण जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हा निर्णय घ्यावा लागतो.
Sangeeta Tiwari’s allegations while resigning from Congress, she was harassed for being a Brahmin
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर