विशेष प्रतिनिधी
नागपूर : संजय राऊत यांच्यासारखे लोक लबाड आहेत. राऊतांमुळे शिवसेनेची विश्वसनीयता खालावली आहे. राऊत पक्षाचे नाहीतर स्वत:चे विचार मांडतात. ज्या लोकांनी संघटनेची एैशी-तैशी केली, अशा लोकांना पहिल्यांदा हाकलावे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे.
एका चॅनेलवरील चर्चेत पक्षाच्या विरोधात भूमिका मांडल्याचा आरोप करून तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यावर ते म्हणाले, किशोर 8 वाजता चर्चा सुरू झाली, 8.30 वाजता संपली. 8.45 ला मला पदमुक्त केले.
तिवारी म्हणाले, “शिवसेनेची विचारसारणी कट्टर हिंदुत्त्ववादाची होती. मल्लिकार्जुन खर्गे सनातन धर्मावर टीका करतात. तरीही, शिवसेनेतील लोक सौम्य प्रतिक्रिया देतात. मला काँग्रेसच्या हिंदू विरोधी वक्तव्यावर बोलू नका, असे वारंवार अनिल देसाई आणि हर्षल प्रधान यांच्याकडून सांगण्यात येत होते. जे लोक पक्षाला रसातळाला नेत आहेत त्यांनाच महत्त्व दिले जात आहे. दिवाकर रावते, सुभाष देसाई, अनिल देसाई, अनंत गितेंसारख्या लोकांना पक्ष वाढवण्याची जबाबदारी दिली पाहिजे.
“आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांना बांगलादेशीयांनी निवडून आणले. बांगलादेशी नसते, तर एकही जागा निवडून आली नसती. काँग्रेससोबत एकही दिवस राहायला नको पाहिजे. वीर सावरकर हे आमचे आराध्य दैवत आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्त्व हा आमचा प्राण आहे. पण, आमचा पक्ष अजमेरला चादर पाठवत आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.
“संजय राऊतांनी नागपुराला येऊन स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या दिवसापासून पक्षात गळतीला सुरूवात झाली. मी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी माझ्या पैशाने 10 वेळा मुंबईला गेलो. एकदा उद्धव ठाकरे मला गेटवर भेटले म्हणाले, ‘मला तुम्हाला शांतपणे भेटायचे आहे.’ एकदा मला हाकलून दिले. वेळ दिली नाही. उद्धव ठाकरेंनी माझ्याशी कधी संवाद साधला नाही. नवीन आलेल्या माणसांना दिवसांत चार-चार वेळा बोलतात, नंतर काढून फेकतात,” असा आरोप तिवारी यांनी केला.
Sanjay Raut is a liar, because of him the credibility of Shiv Sena has deteriorated, Kishore Tiwari alleges
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा