विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरूड प्रकरणात तिन्ही मुलींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ससून रूग्णालयातील अहवालात या मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमा नसल्याचे म्हटले आहे. Kothrud alleged assault case
या तिन्ही मुलींनी पोलिसांवर अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी रात्री तीन वाजेपर्यंत तीन मुलींसह आमदार रोहित पवार, वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांच्यासह अन्य नेत्यांनी ठिय्या मांडून बसले होते.
पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मुलींनी केल्यानंतर ससून रूग्णालयातील अहवाल समोर आला आहे. अधिकृतरित्या हा अहवाल जारी केला नाही. तरी, त्यातील माहिती समोर आली आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात छळ केल्याचा आरोप झाल्यावर मुलींनी स्वत: ससून रूग्णालयात जाऊन तपासणी करून घेतली होती. पण, या अहवालात मुलींच्या अंगावर कुठल्याही ताज्या खुणा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी लाथ बुक्क्यांनी मारहाणीचा आरोप करणाऱ्या मुलींच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
या प्रकरणी माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथून बेपत्ता असलेली मुलगी पुण्यात राहत असलेल्या ठिकाणी 1 ऑगस्टला दुपारी अडीच वाजता गेली होती. 30 मिनिटे तिची चौकशी करून पोलीस निघून गेले. नंतर साडेचार वाजता पोलीस पुन्हा घरी आले त्या मुलीच्या घरी आले होते आणि तिन्ही मुलींना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 1 ऑगस्टला दुपारी 4.30 ते 7.50 पर्यंत पोलिसांनी मुलींना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मध्यरात्री 2 वाजता मुलींनी तक्रार दाखल केली. 2 ऑगस्टला सकाळपासून मुलींनी तक्रार दाखल करून पोलिसांवर ऑस्ट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन केले.
वैद्यकीय चाचणी करून घेण्याचीदेखील मागणी केली. परंतु, पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली नाही. तसेच, वैद्यकीय चाचणी करण्यासाठी लिस्टदेखील दिली नाही. नंतर मुलींनी स्वत: वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मुलींनी ससून रूग्णालय गाठले. 2 ऑगस्टला मुली त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ससून रूग्णालयात तपासणीसाठी पोहोचल्या. सायंकाळी 6.30 वाजता त्यांची तपासणी सुरू झाली. या तपासणीनंतर ससूनचा अहवाल समोर आला आहे. त्यात 24 तासांमध्ये कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण मुलींच्या अंगावर नाही, असे अहवालात समोर आले आहे.
Sassoon Hospital report in Kothrud alleged assault case, no fresh injuries on girls’ bodies
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!