Municipal Corporation : आंदेकर टोळीवर गुन्ह्यांची मालिका सुरूच, आणखी दोन गुन्हे दाखल, महापालिकेकडून तक्रारी दाखल,

Municipal Corporation : आंदेकर टोळीवर गुन्ह्यांची मालिका सुरूच, आणखी दोन गुन्हे दाखल, महापालिकेकडून तक्रारी दाखल,

Municipal Corporation

विशेष प्रतिनिधी

पुणे : Municipal Corporation पुण्यातील आंदेकर टोळीवर गुन्ह्यांची मालिका सुरूच असून नाना पेठेतील डोके तालमीजवळ बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रा.प्रमुख बंडु आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबियाविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Municipal Corporation

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २३ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात कारवाई करुन बेकायदा फ्लेक्स काढून टाकले होते. त्याबाबत आता महापालिकेच्या अधिकार्‍यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर, प्रियंका कृष्णा आंदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेतील इनामदार चौकातील खुर्शीद कॉम्प्लेक्सच्या समोर फुटपाथवर आंदेकर टोळीने बेकायदा फलक लावले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. Municipal Corporation



महापालिका अधिकार्‍यांनी बेकायदा फ्लेक्स प्रकरणात आणखी एक फिर्याद दिली आहे. रफिक अहमद सैय्यद आणि इब्राहिम हशम शेख यांनी हा फ्लेक्स लावला असून त्यांनी ज्यांच्यासाठी हा फ्लेक्स लावला, त्या बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर अशा ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आंदेकर टोळीने केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने २३ सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. या कारवाईत पत्र्याचे शेड, तात्पुरते केलेले बांधकाम, तसेच गणेश पेठेतील नागझरीत बेकायदा सुरू केलेल्या मासळी बाजारात येथील बेकायदा बांधकाम, फ्लेक्स जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यावेळी केलेल्या कारवाईबाबत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Series of crimes against Andekar gang continues, two more cases registered, complaints filed by Municipal Corporation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023