विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यात असून त्यांची प्रकृती खालावली आहे. बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केले आहेत.मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.
पवार यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपले पुढच्या चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केले आहेत.
शरद पवारांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये बोलताना त्यांना त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल्याचे समजते.
Sharad Pawar’s health deteriorated, all tours cancelled
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार