विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाची महत्वाची बैठक बुधवारी हाेणार आहे. या बैठकीत शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या एकत्रिकरणावर चर्चा हाेणार आहे. मात्र, शरद पवार गटाचे नेते आणि राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विराेधातील सूर व्यक्त केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा शरद पवार यांच्याबरोबर राहिलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंकुश काकडे यांनी याबाबत एक पत्र लिहिले आहे. यासंबंधीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना निघण्यापूर्वी व्हावा. पक्षाच्या १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत याविषयीची आपली भूमिका मांडू असे त्यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांना लिहिलेल्या पत्राबाबत काकडे म्हणाले, ‘शरद पवार यांनी एकत्रीकरणाबाबत भाष्य केल्यानंतर यासंबंधीच्या पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या. खासदार सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. त्या काय निर्णय घेतील ते माहिती नाही, मात्र कार्यकर्ते काय म्हणतात, त्यांच्या भावना काय आहेत, वैयक्तिक मला काय वाटते, हे त्यांना सांगणे माझे कर्तव्य वाटले. त्यात मी सध्याचा पक्षाची स्थिती, अन्य पक्षांची स्थिती याबाबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी लिहिले आहे.
मी सन १९७८ पासून शरद पवार यांच्याबरोबर आहे. आताही ते घेतील तो निर्णय मान्य असणारच आहे, मात्र खासदार सुळे यांना वस्तुस्थिती काय आहे ते सांगणे महत्त्वाचे वाटले, असे ते म्हणाले.उद्धव व राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची ही चर्चा आहे. वेगळे होऊन त्यांना तर अनेक वर्षे झाली. अजित पवार, सुळे यांना वेगळे होऊन फक्त अडीच-तीन वर्षे झाली आहेत, त्यामुळे या चर्चा होत असतात. काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते. तेच काहीतरी बोलत असतात,
Sharad Pawar group meeting and Ankush Kakade’s protest over integration
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित