विशेष प्रतिनिधी
मुंबई : बुद्धीचातुर्याच्या बळावर सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. Sharad Pawar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांचा काल 55 वा वाढदिवस होता. त्यांना राज्यासह देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
महाराष्ट्र नायक’ या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारा लेख लिहिला आहे. यामध्ये शरद पवार यांनी फडणवीसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. शरद पवार यांनी लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक मी पाहिला आहे. त्यांचे काम पाहिले की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीस यांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धींगत होत राहो, अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे.
पुढे लिहिले आहे की, देवेंद्र फडणीस हे कायद्याचे पदवीधर असल्याचे पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती, अशी स्तुतीसुमने शरद पवारांनी वाहिली आहे.
Sharad Pawar praised Chief Minister Devendra Fadnavis for his intelligence
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला