विशेष प्रतिनिधी
पुणे :Ravindra Dhangekar काँग्रेसला हात दाखवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी खास पद तयार करण्यात आले आहे. महानगर प्रमुख पद तयार करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले गेले आहे.Ravindra Dhangekar
काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवून धंगेकर आमदार झाले होते. त्यांची निवडणूक चांगलीच गाजली होती. महाविकास आघाडीचा धंगेकर पॅटर्न असे म्हटले जाऊ लागले होते. पण 2024 च्या लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या रवींद्र धंगेकरांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलेल्या धंगेकरांनी पंजाची साथ सोडत शिवधनुष्य हाती घेतले. पण पक्षात प्रवेश केल्याच्या अनेक दिवसांनंतरही धंगेकरांना कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. पण आता अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांकडे मोठी जबाबदारी दिली आहे.
रवींद्र धंगेकर यांची शिवसेना महानगर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केले आहे.सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रवींद्र धंगेकरांना पुणे शहरात पक्षवाढीची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी (कार्यक्षेत्र -पुणे महानगर) निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले आहे. आता, धंगेकरांची निवड केल्यामुळे पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढू शकते. कारण पुण्यात धंगेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे, ज्याचा फायदा शिंदे गटाला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो.
रवींद्र धंगेकर ह्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने ते राज्यभर चर्चेत आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले, त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर सातत्याने आक्रमक टीका केल्याने ते चर्चेत होते. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण असो किंवा पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन त्यांनी महायुती सरकारला सातत्याने लक्ष्य केले होते. मात्र, नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर, पुढील राजकीय मार्गावर वळण घेत त्यांनी काँग्रेसला बाय करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आपण कोणत्याही पदासाठी पक्षात प्रवेश केला नसून एकनाथ शिंदेंच्या विकासकामांचा अजेंडा पाहून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे धंगेकरांनी म्हटले होते.
धंगेकरांच्या पत्रावर शहराध्यक्ष असे म्हटले असते तरी नाना भानगिरे हेच शहराध्यक्ष असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. महानगर प्रमुख अशी नवी जबाबदारी धंगेकर यांच्यावर दिली आहे.
Shiv Sena Shinde group’s Dhangekar pattern, political rehabilitation by creating the post of metropolitan chief
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर