विशेष प्रतिनिधी
पुणे: शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या मोटारीवर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली. गणपती माथा परिसरात सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
निलेश घारे हे गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. याच दरम्यान कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीवर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले.
गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सील करून फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. गाडीवर किती गोळ्या झाडल्या आहे? कोणत्या प्रकारच्या बंदुकीचा वापर करण्यात आला याचा तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
राजकीय सुडाचे स्वरूप?
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश घारे यांचा राजकीय वावर, त्यांचे कुणाशी वैर आहे का? तसेच त्यांचा कुणाशी वाद झाला का? यांची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घारे स्थानिक राजकारणात सक्रिय झाले होते. त्यामुळे हे राजकीय सूडाचे स्वरूप असू शकते, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
या घटनेमुळे गणपती माथा परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे.
Shooting at Shinde Group Yuva Sena district chief’s car in Pune
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर