विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य कंत्राटी महामंडळ अध्यक्षपद मिळूनही भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मतदारसंघातून दावेदारी कायम ठेवली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही, श्रीनाथ भिमालेंनी पर्वतीत लढण्याचा निर्धार कायम असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, मला आजही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. महामंडळावर नियुक्तीबद्दल कोणतेही पत्र मिळालेलं नाही. कोणत्याही नेत्याने देखील सांगितलं नाही. प्रसिद्धी माध्यमांमधून ही बातमी कळाली
भिमाले म्हणाले, निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी झालेली आहे. पर्वतीत मी लढणार आणि जिंकणार हा नारा कायम आहे. गेली पंधरा वर्षांपासून मागणी करत असून यंदा लढण्याची पूर्ण तयारी झालीय.
पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मतदारसंघावर दावा केला आहे. लढणार आणि जिंकणार म्हणत मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरू केली आहे.
Shrinath Bhimale Demand BJP candidate from Parvati
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात
- NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
- CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!
- Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी