विशेष प्रतिनिधी
पुणे : Sonali Andekarगणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आयुष कोंकर याची गोळ्या घालून हत्या काऱ्न्यूयात आली आणि संपूर्ण शहर या घटनेने हादरलं. तेव्हापासूनच हे प्रकरण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत आहे. आता या प्रकरणात सोनाली आंदेकर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयीन कोठवडी देखील सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
आयुष कोमकर खून प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह १३ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sonali Andekar
या प्रकरणी सोनाली आंदेकरला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरुबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके आणि मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी प्रियंका गोरे यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आयुष कोमकर हा सोनाली आणि प्रियंका आंदेकर यांचा भाचा होता. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वाद आणि टोळीयुद्धातून हा खून झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सगळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंतरण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोमकरच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडी परिसरात एकत्रित बैठक झाली होती आणि ते एकमेकांना मोबाइल घरी ठेवून भेटत होते असे तपासात समोर आले आहे. Sonali Andekar
या खून प्रकरणात सोनाली आणि प्रियंका यांची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. तपासादरम्यान सोनाली खून प्रकरणाचा कट रचण्यात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनाली आणि प्रियंका यांना ताब्यात घेण्यापासून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याने सोनाली आणि प्रियंका आंदेकरसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Sonali Andekar
Sonali Andekar arrested for obstructing government work; 13 more people booked
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!