विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: सिल्वर ओकवर तुम्हाला का जावे लागते? कोण आहेत तुमचे ते. अजूनही त्यांची लाचारी संपणार नाही,असा हल्लाबोल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केला आहे. पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले Silver Oak
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीका न करता आपल्याला चांगले काम करायचे आहे.मी नगरसेवक ते आमदार झालो तरी मला कोणीही संजू भाऊ म्हणायचे. मला मला मंत्री महोदय म्हणण्यापेक्षा संजू भाऊ म्हटलेले आवडते. या शहरातील बटन ( नशेची गोळी) आणि मटण संपवणार. या शहरात एक धाक असला पाहिजे.
माझ्या संघर्षाचा काळ प्रदीप जैस्वाल यांनी पाहिला आहे असे सांगून शिरसाट म्हणाले , आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे सुचत नाही, पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे. मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही. पण कार्यक्रम करेक्ट करतो. काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आहे. आम्हाला बंड केल्यावर गद्दार, पन्नास खोके टीका झाली. लोक म्हणायचे आता हे निवडून येत नाही
पण माझं नाव संजय आहे, मला दूरचं कळतं. यांचा जन्म झाला नाही, तेव्हापासून मी काम करतो. मातोश्री मधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारले आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे? आमचा माणूस ज्यांची नाव सांगतो, ते पडतात” अशी नाव न घेता अंबादास दानवे यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली.
आपल्या मंत्री पदाबाबत ते म्हणाले, मंत्री होणार यासाठी मला फोन आला. पण भिती वाटत होती. बायकोला सांगू की नको, पण सांगितले. मंत्री पदाची शपथ घेत असताना हात पाय लटपट कापत होते. शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते, आणि ते म्हणाले करोडोच्या संपत्तीपेक्षा हा दिवस महत्वाचा आहे. रिक्षा वाल्याचे दिवस बदलले.
मी मंत्री झालो, तर काही जणांच्या पोटात दुखत होते. मेळावा घ्या, वाढदिवस साजरा करा. आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही. आमचा शिवसैनिक अजूनही जित्ता आहे. कसली गुर्मी आणि मस्ती आहे. पालकमंत्री काय असतो दाखवतो. बांगड्या भरा साल्यानो, आमच्या नादाला लागू नका” असा संजय शिरसाट यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांना इशारा दिला. “मी पाच वर्षे पालकमंत्री राहणार आहे. राज्याचे काम जिल्ह्यातून करू. “दादगरीचे जे वारे सुरू आहे, ते संपवायचे आहे. या शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे” असं ते म्हणाले.
Still helpless at Silver Oak, Shinde’s ministers attacked the Thackeray group
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले