विशेष प्रतिनिधी
पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.गुणाट परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी श्वान पथक बोलावले आहे. त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात आहे..पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्तात्रय गाडेच्या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. Swargate rape case
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी त्याने चोरीचे अनेक गुन्हे देखील केले आहेत.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा मंगळवारी पहाटे बलात्कार करुन शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी गेला. गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र दुपारी माध्यमांमधून त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरु झाल्या तेव्हा तो गायब झालाय. शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी पोलीस उसाच्या शेतात ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावयाच गावात आरोपी दत्ता गाडे यांचं घर आहेस्वारगेट मध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते. लिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे. गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर याठिकाणी 2 गुन्हे तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात असे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे.
Swargate rape case accused Datta Gade’s Gunat village has become a police camp
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…