विशेष प्रतिनिधी
जळगाव : जिल्हा बँक मजूर फेडरेशन भ्रष्टाचारावरून गुलाबराव पाटील आपल्या मागे लागणार हे गुलाबराव देवकरांना माहिती आहे. त्यामुळे गुलाबराव देवकर सत्तेतील पक्षात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात आले तरी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
गुलाबराव देवकर हा नकली गुलाबराव आहे. खरा गुलाबराव हा इकडे आहे. अजित पवार गटात प्रवेश मिळत नसल्यामुळे गुलाबराव देवकर हे भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदानाची शाई अजून बोटावरती पुसली गेली नाही आणि त्याआधीच गुलाबराव देवकर यांनी पक्ष बदलणे सुरू केले आहे. मतदानासाठी खालचा कार्यकर्ता जो त्यांच्यासाठी मत मागत फिरत होता त्यांना न विचारता गुलाबराव देवकर पक्षांतर करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी गळचेपी झाली असेल. ते कोणत्याही मक्षात आले तरी मी मात्र त्यांना सोडणार नाही असे पाटील यांनी सांगितले.
माझ्याकडे पूर्वी असलेलं खातच पुन्हा मला मिळाला आहे. पुन्हा मला पाणीपुरवठाचे खाते मिळाल्याने मला आनंद आहे. राज्यात पाणीपुरवठ्याच्या योजना या काही प्रमाणात पूर्ण झाल्या असून काही अद्याप प्रलंबित आहे. पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल. ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खाता देण्यात आलं याचा आनंद आहे, असे सांगून पाटील म्हणाले राज्यात पाणीपुरवठ्याच्या जवळपास सर्व योजना पूर्ण झाल्या आहेत.
मात्र काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे हे संथ गतीने सुरू आहे. त्यांना ब्लॅक लिस्ट करून ती पुन्हा कशी सुरू करता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठवाडा ग्रीड हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार त्यांचा महाराष्ट्रातील स्वप्नातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प 30 हजार कोटींचा केंद्राच्या मंजुरीच्या आशेवर त्याचा डीपीआर आम्ही तयार केला आहे. या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे . हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आयुष्यभर माझेही नाव त्याला जोडलं जाणार आहे.
पाणीपुरवठा खात्यात मला पुण्याचे काम करण्याची संधी मंत्रिमंडळ खाते वाटपात भाजपचा वरचष्मा आहे का या प्रश्नावर ते म्हणाले,चष्मा वर असो वा खाली सरकार सरकार असतं . कॅबिनेट मंत्री कुठलाही पक्षाचा असला तरी त्याला कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडायचा अधिकार असतो. कोणतंही खातं हे हलकंफुलकं नसतं. काम करणारा माणूस लाथ मारेल तेथे पाणी काढेल. शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही होती. पण ते शिवसेनेला मिळालं नाही. शेवटी सरकार स्थापन झालं आणि लोकांच्या टिकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं. विरोधकांकडून मंत्रीपद खातेवाटप यावरून टीका केली जात होती. खात हे वजनावर नसतं
पिक विमा बाबत काही सर्कलमध्ये शेतकऱ्यांची भरपाई रखडलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पिक विमा संदर्भात लवकरच तोडगा काढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
-सीसीआय कापूस खरेदी केंद्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
कापूस खरेदी केंद्र वाढवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत . मॉइश्चर तपासूनच सीसीआय केंद्रात कापूस खरेदी केला जातो. त्यामुळे काही ठिकाणी अडचण येत आहेत. शेतकऱ्यांनी कमी मॉइश्चर असलेला कापूस विक्रीसाठी कसा आणता येईल याकडे लक्ष द्यावंखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी अधिकाधिक कापूस खरेदी केंद्र कसं करता येईल याकडे मी लक्ष देणार संजय राऊत यांच्या घराच्या झालेल्या लेकीच्या संदर्भात खिल्ली उडवताना पाटील म्हणाले, संजय राऊत यांनीच ती माणसं पाठवली होती हे मी आधीच सांगितलं होतं .
संजय राऊत काय मोठा डॉन व्हायला चालला का ? सकाळी दहा वाजता भोंगा वाचतो म्हणून देशाचे फार मोठा काम करतो असा त्यांना वाटतं. आमच्या भरोशावर खासदार झाले म्हणून दोन पोलीस त्यांच्या मागे आहेत. खासदारकी संपल्यावर एक पण पोलीस त्यांच्या मागे दिसणार नाही.
छगन भुजबळ हे ओबीसी मोठे नेते आहेत त्यामुळे सर्व ओबीसी नेते त्यांची समजूत काढतील. भुजबळ यांची या राज्याला व सर्व पक्षांना गरज आहे, असेही पाटील यांनी सांगितले.