विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तमिळनाडूचा दाखल दिला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. उगीच आम्हाला खोलात जायला लावू नका. सूचना करणारे मान्यवर हे अनेक काळ सरकारमध्ये होते, असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे. अजित पवार हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते.Ajit Pawar
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीAjit Pawar
अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांची मर्यादा ठरवण्याच्या आधी तामिळनाडू हे आरक्षण दिलं आहे. कुणी काय म्हणलं याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्यांनी ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं मत आहे. त्या मताशी माझा काहीही संबंध नाही. राज्य कायद्याने नियमाने आणि लोकशाही पद्धतीने चालव हेच मी पाहतो. “हे सूचना करणारे अनेक काळ सरकारमध्ये होते. उगीच आम्हाला खोलात जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. मला खोलात जायचे नाही,” असे म्हणत अजित पवार यांनी एक प्रकारे शरद पवार यांना टोला लगावला आहे.
समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन वेळप्रसंगी संसदेत घटना दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण मर्यादा घालून दिली आहे. तरी तामिळनाडू सारख्या राज्यात 72% आरक्षण आहे. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी आता ठोस पावले उचलावी जावीत, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
The dignitaries who gave the suggestions have been in the government for a long time, Ajit Pawar’s attack on Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा