PMC New Ward Structure:२२ ऑगस्टला जाहीर होणार पुण्याची प्रभाग रचना!

PMC New Ward Structure:२२ ऑगस्टला जाहीर होणार पुण्याची प्रभाग रचना!

Pune Municipal Corporation Election.

विशेष प्रतिनिधी

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. या निमित्ताने पुण्यातील नवीन प्रभाग रचना २२ तारखेला जाहीर होणार आहे.

PMC New Ward Structure

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षीच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षण, प्रभाग रचना यांसारख्या मुद्द्यांवरील न्यायालयीन सुनावण्यांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता सर्व संबंधित प्रकरणांवर न्यायालयाने निकाल दिल्याने राज्य निवडणूक आयोगाला डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश मिळाले आहेत.
अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून बराच कालावधी लोटला असून, सध्या प्रशासकांमार्फत कारभार चालवला जात आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अभावामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता निवडणुका अटळ असल्याने प्रशासकीय स्तरावरही तयारीला वेग आला आहे.

नवीन प्रभाग रचना: लोकसंख्या आणि शहरविस्ताराचा विचार
लोकसंख्यावाढ आणि शहरांच्या विस्ताराला अनुसरून नवीन प्रभाग रचना करण्याच्या दिशेने राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेत बदल अपेक्षित असून, लवकरच नवीन प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना
पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागात सुमारे ९० ते ९५ हजार मतदार असतील अशा पद्धतीने प्रभाग रचना केली जाणार आहे. यासाठी अनेक जुन्या प्रभागांमध्ये नवीन मतदारयाद्यांचा समावेश होईल. मागील काही काळात पुणे महानगरपालिकेत अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. खडकवासला ते केशवनगरपर्यंतच्या प्रभागांमध्ये या नवीन गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

 

Shashikant Shinde राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची मागणी

जुन्या पुण्यातील प्रभागांमध्ये आधीच ९० ते ९५ हजार मतदार असल्याने येथे नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या भागांत प्रभागांची पुनर्रचना होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी नाले प्रभागांच्या हद्दीचा आधार मानले गेले असल्याने, काही भाग दुसऱ्या प्रभागांना जोडले जाऊ शकतात किंवा काही प्रभागांचे भाग अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट होऊ शकतात. नवीन प्रभागांच्या बाबतीत, वाघोली आणि लोहगाव वगळता इतरत्र नवीन प्रभाग निर्माण होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

जाहीर होणार असलेल्या या नवीन प्रभाग रचनेबद्दल पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “निवडणूक आयोगाने नवीन प्रभाग रचना करणे आवश्यकच आहे. ज्या नवीन गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात आला आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र असे नवीन प्रभाग निर्माण करावेत. नवीन प्रभाग निर्माण केल्याने कामात सुटसुटीतपणा येतो आणि जनतेत समावेशकतेची भावना निर्माण होते. या नवीन प्रभाग रचनेवर काही तक्रारी आणि प्रतिक्रिया असल्यास पंधरा दिवसांच्या आत त्या नोंदवता येणार आहेत. ही नवीन प्रभाग रचना जाहीर होऊन लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात, हेच अपेक्षित आहे.”

२२ ऑगस्टला प्रभाग रचना जाहीर
नवीन प्रभाग रचनेची घोषणा येत्या २२ ऑगस्टला होणार असून, याबाबत जनता, राजकीय नेते, आजी-माजी आणि भावी नगरसेवकांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे. ही रचना निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

The new ward structure of Pune Municipal Corporation will be announced on August 22

 

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023