विशेष प्रतिनिधी
पुणे : Praveen Gaikwad संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.Praveen Gaikwad
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. यावर बोलताना गायकवाड म्हणाले, हा माझ्या एकट्यावर झालेला हल्ला नाही, कारण मी गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करत आहे, हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे. हा माझ्यावर नाही, तर पुरोगामी विचारांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रवीण गायकवाड म्हणाले, शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काळे वंगण तेल टाकले, माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जी विचारधारा आहे, डॉ. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर यांचा खून झाला. गौरी लंकेश यांचाही खून झाला, सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, पक्षानंतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार आहे. संभाजी ब्रिगेडचा काम चालूच राहणार आहे, पण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी याचा निषेध करणार नाही. मात्र, ज्यांनी हे घडवून आणलंय ही शेवटाची सुरुवात आहे एवढच सांगतो,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, ज्यावेळी मी या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतरही कुठलीही पोलिस यंत्रणा याठिकाणी नव्हती. मला असे वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा नव्हती का? काही ठरवून षड्यंत्र होते का? आज मी माझ्या बहुजन कार्यकर्त्यांमुळेच जिवंत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला.
This is a conspiracy, a plot to kill me, alleges Sambhaji Brigade state president Praveen Gaikwad
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार