विशेष प्रतिनिधी
Pune News: पाकिस्तानमधून काही व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाम भूमिका घेत “पाकिस्तानमध्ये घुसून मारणारा भारत आहे. अशा पोकळ धमक्यांना घाबरण्याची गरज नाही,” असा विश्वास व्यापाऱ्यांना दिला.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना तुर्कीविरोधात बहिष्काराचे अस्त्र उगारून ‘राष्ट्र प्रथम’ अशी भूमिका घेणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. पहलगाममधील हल्ला हा केवळ भारतीयांवर नव्हता, तर तो मानवतेवर हल्ला होता. अशा दहशतवाद्यांना मदत न करण्याचा निर्णय घेणारे व्यापारी कौतुकास पात्र आहेत,” असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, “आमची तयारी पूर्ण आहे. उच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर आम्ही आमचा पक्ष प्रभावीपणे मांडणार आहोत.” न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला संबंधित याचिकांवर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले असून नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
“महायुती ही ठाम आहे. आम्ही तिन्ही पक्ष मिळूनच निवडणुका लढणार आहोत,” अशी घोषणा फडणवीस यांनी केली. अपवादात्मक काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्वतंत्रपणे लढले जाईल, मात्र एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचारच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठे वेगळे लढलो, तरी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ,” असेही ते म्हणाले. “पाच वर्षांपासून कार्यकर्ते काम करत असल्यामुळे काही ठिकाणी त्यांचा आग्रह स्वाभाविक आहे. मात्र, निवडणुकीनंतर अशा ठिकाणी पुन्हा महायुती स्थापन होईल,” असेही त्यांनी जाहीर केले.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही मोठी अडचण नाही,” असे फडणवीस म्हणाले. “पावसाळा फारच जास्त असल्यास विशिष्ट भागासाठी मुदतवाढ मागितली जाईल, पण निवडणुका वेळेतच होतील, याबाबत सरकार आणि निवडणूक आयोग कटिबद्ध आहेत,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
“लॉरेन्स बिश्नोई यांचे पोस्टर काही ठिकाणी झळकले असून त्यावर तातडीने कारवाई होईल,” असा इशारा फडणवीस यांनी दिला. “गोपीनाथ पडळकर यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. लॉरेन्स बिश्नोई याचे महिमामंडन सहन केले जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
Threat from Pakistan; “India is a country that strikes inside,” warns Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?