Pune : पुण्यातील ३२ मुख्य रस्ते आणि २२ चौकांमध्ये राबवली जाणार वाहतुक प्रतिबंधक मोहीम

Pune : पुण्यातील ३२ मुख्य रस्ते आणि २२ चौकांमध्ये राबवली जाणार वाहतुक प्रतिबंधक मोहीम

Pune

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune शहरातील ३२ प्रमुख रस्ते आणि २२ वर्दळीच्या चौकांवर वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील वाहतूक पोलिसांसोबत समन्वयित मोहीम सुरू केली आहे. यासाठी पालिकेने अनेक नागरी विभागांकडून सविस्तर अहवाल गोळा केले आहेत. अहवाल गोळा केल्यानंतर, पालिकेने घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत वाहतूक कोंडी संदर्भातील प्रमुख अडथळे दूर करण्यासाठी आणि रस्त्यांची क्षमता सुधारण्यासाठी महिनाभराच्या कृती आराखड्याची रूपरेषा देखील आखण्यात आली आहे. Pune

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याविषयी सर्व संबंधित विभागांना मुख्य वाहतूक कोंडी होणारी रस्ते ओळखून त्यानुसार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालानंतर मुख्यत्वे बेकायदेशीर अतिक्रमण, मोठे पदपथ आणि सायकल ट्रॅक, खड्डे, असमान पॅचवर्क आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल, हातगाड्या आणि विवध इलेक्ट्रोनिक इंस्टॉलेशन्स हे अडथळा असल्याचे लक्षात आले. यांसारख्या समस्यांवर वारंवार कारवाई करूनही समस्या कायम असल्याचे लक्षात आले. Pune



वाहतूक कोंडी ही पुण्यातील नागरिकांसाठी आता दररोजची झाली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या ही आता केवळ सामान्य नगरिकांनाच नाही तर इथे येणाऱ्या व्हीआयपींना देखील भेडसावत आहे. एका जागतिक वाहतूक निर्देशांकानुसार, पुणे वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यात १० किलोमीटरच्या प्रवासाला सरासरी ३३ मिनिटे लागतात. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी इशारा दिल आहे की, याप्रकारचा अनियंत्रित विलंब आणि दररोजची वाहतूक कोंडी शहराच्या जीवनमानावर तसेच उत्पादकतेवर देखील परिणाम करत आहे. Pune

यासंदर्भात झालेल्या बैठकीत पीएमसी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रकारचे वीज बॉक्स, खांब आणि बेकायदेशीर बांधकामे यांसारखे भौतिक अडथळे दूर करण्यासाठी एमएसईडीसीएल आणि बीएसएनएल सारख्या एजन्सिंसोबत संयुक्तपणे काम करण्यास तयारी दर्शवली आहे. ‘खड्डे दुरुस्ती, अतिक्रमण हटवणे आणि पदपथांचा आकार बदलणे यासारखे जलदगतीने करता येणारे काम एका महिन्यात पूर्ण केले जाईल,’ असे रस्ते विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले, तर पादचारी आणि सायकल ट्रॅक अरुंद करणे यांसारख्या मोठ्या बदलांना मात्र अतिरिक्त वेळ लागेल असे देखील त्यांनी नमूद केले.

तसेच या बैठकीनंतर अतिक्रमण हटवण्यासाठी आता ठोस पाउलं उचलण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान जानेवारी मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी देखील अनेक रस्त्यांची कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये आखेर पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून कायमची सुटका मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. Pune

Traffic control campaign to be implemented on 32 main roads and 22 intersections in Pune

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023