विशेष प्रतिनिधी
पिंपरी : दुकानाबाहेरील शेड अनाधिकृत असल्याबाबत महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीससह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार पिंपरी कॅम्पात १७ सप्टेंबर रोजी घडला. तक्रार दाखल होताच पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
काँग्रेस युवा प्रदेश सरचिटणीस पंकज बगाडे (वय ४०, रा. आकुर्डी), गणेश दराडे (वय ५०, रा. रमाबाईनगर, पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. शाम अर्जुनदास मेघराजानी (वय ५८, रा. सुखवाणी सिटी समोर, वैभवनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी बगाडे हा युवक काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आहे. फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. १७ सप्टेंबर रोजी आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानामध्ये आले.
तुमच्या दुकानाबाहेरील शेड हे अनाधिकृत आहे. त्या बाबत आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून फिर्यादी यांच्याकडे ५० हजार रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही तर गाडी अंगावर घालुन जिवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळ केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी २६ सप्टेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ओळखीचे दुकानदार यांनाही यापुर्वी अशीच धमकी देवुन वेळोवेळी पैशाची मागणी केल्याचेही उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे तपास करीत आहेत.
Two arrested including Youth Congress state general secretary for demanding Rs 50,000 ransom from shopkeeper
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!
 
				



















