Uddhav Thackeray : गद्दार, नमकहराम, हरामखोर म्हणत उद्धव ठाकरेंनी टाळले रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर

Uddhav Thackeray : गद्दार, नमकहराम, हरामखोर म्हणत उद्धव ठाकरेंनी टाळले रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

पुणे : Uddhav Thackeray  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले होते. मात्र या आरोपांना उत्तर देणे टाळत गद्दार, नमकहराम व हरामखोर अशी शिव्यांची लाखोली वाहिली .Uddhav Thackeray

पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दार व नमकहारांना उत्तर देत नाही. मला ते देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही.Uddhav Thackeray



पत्रकारांनी यावेळी त्यांना अशा प्रकारे आरोप झाल्यावर त्रास होतो का? असा प्रश्न केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हो, मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात. पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसे मी माझे भाषण थांबवू का असे विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात, तेव्हा या वेदनांवर रामबाण उपाय झाला, असे मला वाटते. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकलो, असे ते म्हणाले

ठाकरे म्हणाले, कालचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. हे केवळ माझे श्रेय नाही. पावसामुळे शिवाजी पार्कवर चिखल झाला होता. तळे झाले होते. पण त्याही स्थितीत केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक आले होते. त्यांनी स्वतःची चटणी भाकरी आणली होती. आपल्याकडे बिर्याणी वगैरेची काही सोय नाही. जे येतात ते स्वकष्टाचे येतात. पाऊस पडत असतानाही कुणीही जागचे हलले नाहीत. शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत. बांधावरून उडी मारली की माणूस बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आलेल्या लोकांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जी इतरांना कदाचित वाटत असेल, असे ते एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले.

शिवसेनेचा 1966 मध्ये पहिला दसरा मेळावा झाला. मी 6 वर्षांचा होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवाजी पार्कवर तो घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर काहींनी एवढे मोठे मैदान भरेल का? अशी शंका घेतली. त्यांनी हॉल किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मैदानात सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. पण बाळासाहेबांनी ही सभा शिवाजी पार्कवरच घेण्यावर ठाम राहिले. मी वेडा की लोकं वेडी हे पाहून घेऊ, असे ते तेव्हा म्हणाले होते. आता हे दोघेही वेडे नव्हते हे स्पष्ट झाले आहे. हा प्रवास आजही सुरू आहे. त्यामुळेच पाऊस सुरू असतानाही लोकं जागचे हलले नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

आपल्या देशाला आता पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. आत्ता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत. ते देशाचे नाहीत. देशाचे म्हणून कारभार कुठे सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी काय गुन्हा केला? की थेट त्यांच्यावर रासुका लावण्यात आला. त्यांनी एवढे मोठे राष्ट्रविघातक त्यांनी कोणते काम केले? काल परवापर्यंत ते पंतप्रधानांची स्तुती करत होते. तेव्हा ते देशप्रेमी होते. पण नंतर काय घडले? सोनम वांगचुक यांनी चूक केली असेल, तर मणिपूरमध्ये कुणी चूक केली? लेह, लडाखमध्ये काय स्थिती आहे? तेथील परिस्थिती शांत झाली आहे का? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या हातात मशाली आहेत. पण दुर्दैवाने त्याची एकही बातमी येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते करत राहणार. याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. जिथे जिथे अन्याय दिसेल त्याला लाथ मार असे माझ्या आजोबांनी शिकवलेले ब्रिदवाक्य आहे. हे माझ्या वडिलांनी आयुष्यभर पाळले. तेच घेऊन मी पुढे जात आहे. त्यामुळे अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे हे आमचे कामच आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आमच्या अंगावर येतात. पण त्यांनी त्यांच्याच वंशावळी पाहून कुणी काय सोडले हे पहावे. आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो. मग आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? आम्ही भाजपला सोडले म्हणून हिंदुत्व सोडले असे असेल, तर मग सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागलेली विषारी फळे हेच त्याचे फलित आहे का? हे सांगावे. कारण, स्वतः मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्यकांना सदस्यत्व देते. त्यांना सौगात ए मोदी देते. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडले. तुम्ही सौगात ए नेहरू कधी पाहिले का? सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकले का? मग सौगात ए मोदी वाटणारे हिंदुत्ववादी कसे?

तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत. ज्यांनी हिंदूंना मारले त्या पाकसोबत तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, तर मग तुम्ही चंद्राबाबू नायडूंसोबत गेलात, ते नायडू हिंदुत्ववादी आहेत का? असे विविध प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर शरसंधान साधताना उपस्थित केले. भाजपने जे केले अमर प्रेम आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद, असे कसे असू शकते? असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी व राज 2005 मध्ये वेगळे झालो होतो. त्यानंतर आत्ता एका मुद्यावर आम्ही एकत्र आलो. त्यामुळे आता रोज उठून आम्ही एकत्र आलो, आम्ही एकत्र आलो असे सांगण्याची गरज नाही. आम्हाला एकत्र यायचे नसते तर 5 जुलै रोजी झालेला मेळावा झालाच नसता. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. मराठी माणूस एकवटल्याने काय होणार? याची त्यांना भीती वाटत आहे.

Uddhav Thackeray Dodges Ramdas Kadam’s Allegations, Calls Rivals ‘Traitors’ and ‘Betrayers’

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023