Rupali Chakankar राज्य महिला आयोगामुळेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला फुटली वाचा, रुपाली चाकणकर यांचा दावा

Rupali Chakankar राज्य महिला आयोगामुळेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला फुटली वाचा, रुपाली चाकणकर यांचा दावा

Rupali Chakankar

विशेष प्रतिनिधी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करून या घटनेला वाचा फोडली असा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.Rupali Chakankar

चाकणकर यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे. तर, मला घटना समजल्यावर आयोगाच्या वतीने मी 19 तारखेला सुमोटो दाखल केला होता. ती तक्रार बावधन पोलिसांकडे पाठवली होती. तक्रार दाखल झाली, त्यानंतर गुन्हाही नोंद झाला होता. मी आज कस्पटे कुटुंबाशी बोलले. त्यांनी हगवणे कुटुंबाविरोधात अजून काही गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार सप्लिमेंटरी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितले.

या प्रकरणी आधी तीन आरोपी अटकेत होते. आज सासरा आणि दीर अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची टीम कार्यरत असते. सायबर आणि क्राइमची टीमही सक्रिय होती. बाळा संदर्भातील घटनाक्रम किंवा यात काय घडले, तर वैष्णवीच्या बाळाला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे, जे मी आधी सुद्धा सांगितले आहे. तर, ही घटना घडल्यापासून अनेक गोष्टी विचारल्या जातात. 6/11/2024 रोजी करिष्मा हगवणे हिने राज्य महिला आयोगाला मेल केला होता. हा मेल रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी महिला आयोगाला आला होता. हा मेल आल्यावर पोलिसांना पाठवून त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांचे भाऊ, भावजय आणि घरातील लोकांच्या विरोधात करिष्माने तक्रार केली होती. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2024 रोजीच म्हणजेच ज्या दिवशी करिष्माने तक्रार केली होती, त्याच दिवशी मयुरी हगवणेचा भाऊ मेघराज जगतापने आमच्याकडे तक्रार केली होती.



ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्यानुषंगाने 7 तारखेला 11.30 वाजता या दोन्ही तक्रारी बावधन पोलिसांना पाठवून कारवाई करण्यास सांगितले. तक्रारदार आणि पोलिसांनाही पत्र पाठवले होते. 6 नोव्हेंबर रोजी 485 ची एफआयआर दाखल झाली होती. एक करिष्मा हगवणेची आणि दुसरी मेघराज जगताप यांचीही एफआयआर घेण्यात आल्या. बावधन पोलिसांनी या दोन्ही वेगवेगळ्या तक्रारी घेतल्या होत्या. क्रॉस कम्प्लेंट होत्या. तक्रारदार हे कुटुंबातीलच असल्याने कौटुंबिकवाद कौन्सिलिंग करून मिटवले जाते. त्यानुसार कुटुंबातील लोकांना कौन्सिलिंगसाठी बोलावले होते, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले/

हुंडाबंदीच्या विरोधातील कायदा आहे. गर्भनिदानचा कायदा आहे. तरीही असे गुन्हे का घडतात. नागपूरमध्येही काल हुंड्यासाठी एका महिलेने आत्महत्या केली. हुंडा मागितल्याने मुली आत्महत्या करत आहेत. 35 हजार 971 केस माझ्या मुख्य कार्यालयात आल्या आहेत, त्यापैकी 35 हजार 282 निकाली काढल्या आहेत. आयोग काय करतो? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो, त्यामुळे हा डेटा आहे. मला हे सांगायची गरज नव्हती. पण गेल्या दोन दिवसात चिल्लरचा मोठा आवाज आला त्यामुळे उत्तर द्यावे लागते, असे म्हणत चाकणकरांनी विरोधकांना टोला मारला.

दरम्यान वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना आधीच अटक करण्यात आली होती.

Vaishnavi Hagavane’s suicide case broke out because of the State Women’s Commission, claims Rupali Chakankar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023