विशेष प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane) हुंडाबळी प्रकरणात पोस्टमार्टेम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या एकूण 29 खुणा आढळल्या असून, त्यापैकी 5 ते 6 खुणा ताज्या होत्या. यावरून आत्महत्येच्या दिवसापर्यंत तिचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता, असे स्पष्ट झाले आहे.
वैष्णवीने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे यांना सुरुवातीला अटक झाली होती. तसेच सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 17 मेपासून फरार असताना 22 मे रोजी पहाटे अटक करण्यात आली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
राजेंद्र आणि सुशील हगवणे 17 ते 22 मे या काळात अटक टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिले होते. त्यांना आश्रय आणि मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये मोहन उर्फ बंदू उत्तम भेगडे (वय 60, वडगाव मावळ), बंदू लक्ष्मण फाटक (वय 55, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35, पुसगाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (वय 45, पुसगाव, सातारा), आणि प्रितम वीरकुमार पाटील (वय 47, कोगनोळी, चिकोडी, बेळगाव, कर्नाटक) यांचा समावेश आहे.
माजी मंत्र्याच्या मुलाचाही सहभागप्रितम पाटील हे कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र आहेत. मोहन भेगडे हा हगवणेंचा मित्र आहे, तर बंदू फाटक पवना डॅमजवळील फार्महाऊसचा मालक आहे. अमोल आणि राहुल जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील पुसगाव येथे हगवणे पिता-पुत्रांना आश्रय दिला होता. प्रितम पाटील यांनी कर्नाटकातील कोगनोळी येथे त्यांना लपण्यास मदत केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagawane has 29 marks of assault on her body, five to six of which are very fresh
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं